नांदेड:-(माधव मेकेवाड) – भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण यांना पुणे येथील नामांकित डॉ.सुधाकर जाधवर सामाजिक व शैक्षणिक संस्था, पुणे या संस्थेचा आदर्श प्राचार्य पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे.सदर संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देत असते. यापूर्वी कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्यासह अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण यांनी प्राचार्य म्हणून महाविद्यालय विकासात मोठे योगदान दिले आहे त्याच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला आहे तसेच त्यांच्या कॉलेजला ही सदर विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार देऊन गौरविलेले आहे .डॉ चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक,भौतिक विकासाबरोबरच सामाजिक संशोधन क्षेत्रात ही खूप मोठे काम केले आहे.
त्यांच्याकडे सहा विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य पूर्ण करून पी एच डी प्राप्त केली असून त्यांच्याकडे आठ विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. राज्यशास्त्र विषयाशी संबधित संदर्भ ग्रंथ असलेली ऐकून १६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना गुणात्मक विकासाबरोबरच महाविद्यालयाच्या भौतिक विकासासाठी खूप मोठे प्रयत्न संस्था अध्यक्ष माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांच्या नेतृत्वाखाली केले असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन डॉ.चव्हाण यांना हा पुरस्कार दिला गेला आहे .त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ माधवराव पाटील किन्हाळकर, सचिव मुरादसाब मांजरमकर,कवियत्री डॉ वृषालीताई किन्हाळकर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी,पत्रकार मंडळी,प्रतिष्ठित नागरिक,मित्र परिवार,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.