नांदेड बहुजननामा ऑनलाईन – देशात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर अत्याचारांचे अमानुष प्रकार घडत असून हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशातच नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भाऊजीनी भाऊजीच्या अल्पवयीन मेहुनीचे तोंड ओढणीने बांधून बलात्कार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आलाय हे कृत्य हनमंत आनंदराव पांचाळ नावाच्या व्यक्तीने केले असून तो नायगाव तालुक्यातील राहेर येथील रहिवासी आहे. तो सध्या तेलंगणातील बोधन येथे सुतारकीचे काम करतो.काही दिवसांपूर्वी पिडीत अल्पवयीन मुलीच्या बहीणीसोबतच हनमंत पांचाळ याचा विवाह झाला होता.
पत्नी आजारी असल्याने तीला बिलोली तालुक्यातील खपराळा येथे आराम करण्यासाठी पाठून दिले होते.पिडीत मुलगी ही हनमंत पांचाळ याची सख्खी मेव्हणी असून ती नायगाव येथे आपल्या चुलत्याकडे राहते आणि सध्या ती बारावीत शिकत आहे. ०५ जुलै २०१९ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान हनमंत पांचाळ याने मोटारसायकल घेवून काॅलेज जवळ गेला आणि अल्पवयीन असलेल्या आपल्या मेव्हणीला तुझे चुलते गावाला गेले असून तुला मला घेण्यासाठी पाठवले आहे असे सांगितले. परंतु तिला गावाकडे न घेऊन जाता बिलोली-बोधनकडे मोटारसायकल घेवून जात असतांना पिडीतेने विरोध केला परंतु आरोपीने धमकी देत पण गप्प बस नाही तर तुझ्या बहीणीला संपवून टाकीन अशी धमकी दिली. पीडितेला रूमवर घेऊन जात तोंड ओढणीने बांधून बलात्कार केला आणि ०६ जुलै २०१९ रोजी खपराळा येथे आणून सोडून दिल्याची घटना घडली.बहिणीच्या नवऱ्याने(भावजी) नेच लहान बहीणीसारख्या असलेल्या अल्पवयीन मेव्हणीसोबत बळजबरी केल्याने संपूर्ण कुटुंबच हादरुन गेले आहे.परंतु पिडीतेच्या बहीणीने याविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या अमानुष प्रकाराबाबत पिडीतेच्या बहीणीने आपल्या संसाराचे काहीही होवो पण घाणेरडे कृत्य करणाऱ्याला शिक्षा मिळाली पाहीजे असे सांगून कुटुंबाला धिर दिला.त्यानुसार ०९ जुलै २०१९ ला नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बलात्कारासह पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक,पोलीस जमादार करत आहेत.