नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – नाशिकमधील एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षातील एका आमदाराच्या समर्थकांनी एका डॉक्टरला शिवीगाळ केला आहे. याबाबत व्हिडिओ समोर आला असून त्यात आमदाराचे समर्थक अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरत डॉक्टरांना शिवीगाळ करत आहेत. रिपोर्टनुसार, नाशिकच्या एका रुण्यालायतील या घटनेनंतर एमआयएम आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइलला अटक केले गेले आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, नाशिकमधील मालेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये एमआयएम आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइलच्या समर्थकांनी डॉक्टरांसोबत खूप वाईट वागवूक करत त्यांच्याशी वाद घालताना घाणेरड्या शिव्या दिल्या आहेत. या समर्थकांचा आरोप आहे कि डॉक्टरांनी रुग्णालयातून २ रुग्णांना डिस्चार्ज देण्यास उशीर केला आहे. पण या समर्थकांनी कशाप्रकारे डॉक्टरांना शिवीगाळ केला ते व्हिडिओमध्ये पाहू शकतो.
व्हिडिओमध्ये आमदाराचे समर्थक डॉक्टरला अनेक वेळा फोन केल्यानंतर काहीही न बोलल्याबद्दल तक्रार करताना दिसत आहेत. यादरम्यान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइलच्या समर्थकांमधील एक जण डॉक्टरांना शिवीगाळ करतो. पोलिसांनी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइललाही अटक केले आहे.