पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा उपचार करणार्या दिल्लीतील एका डॉक्टरालाच कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तब्बल 800 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरमुळे अनेक लोक भीतीखाली आहेत. कोरोनाव्हायरसचा धोका भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 649 झाला आहे. दरम्यान, दिल्लीतील एका डॉक्टरालाच कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तब्बल 800 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
या डॉक्टराचे मोहनपुरी भागातील मोहल्ला येथे क्लिनिक होते. त्यामुळे त्याच्याकडून उपचार घेतलेल्या रुग्णांचा शोध सध्या पोलीस आणि आरोग्या विभागाचे कर्मचारी घेत आहेत. सौदी अरेबियातून परतेल्या एका महिलेवर या डॉक्टरांनी उपचार केले होते. मोहल्ला क्लिनिकच्या डॉक्टरांना या महिलेकडूनच कोरोना संक्रमण झाले. त्यानंतर आता या डॉक्टरांची पत्नी व मुलगी यांनाही कोरोना झाला आहे. आता मौजपूर परिसरातील सुमारे 800 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
त्यामुळे 12 मार्च ते 18 मार्च दरम्यान, या डॉक्टरांकडून उपचार घेतलेल्या सर्व रुग्णांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास तातडीने रुग्णालयात जाण्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण परदेशात गेला होता की नाही हे अद्याप कळू शकले नाही.