बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आनंदी आनंद असल्याचा आणि पाकिस्तानने कधीही श्त्रसंधीचे उल्लंघन न केल्याचा दावा पाकिस्तान आजपर्यत करत आला आहे. मात्र अलीकडेच जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचे नेते हक नवाज खान यांनी एक व्हिडीओ शेअर करुन पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हक यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले आहे की, अखनुर ते लेपोवल्ली पर्यंतच्या प्रत्येक भागात घडणाऱ्या ९० टक्के घटनांमध्ये पाकिस्ताननेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्य पहाटे दोन -तीन बॉम्ब टाकून शांत बसतात आणि त्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिकारात तेथील स्थानिक लोक मारले जातात. सीमेवर राहणाऱ्या लोकांमध्ये यामुळे दहशत निर्माण झाली असून पाकिस्तानी सैन्याच्या भितीने कोणीही काहीही बोलू शकत नसल्याचे हक यांनी सांगितले आहे.