नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाव्हायरसच्या मुद्यावर पंतप्रधान कार्यालयात (PMO) बैठक झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत कोरोना व्हायरसशी संबंधित प्रकरणांची माहिती घेतली आणि आढावा बैठक घेतली. या दरम्यान पंतप्रधानांनी उद्योग क्षेत्राची देखील माहिती घेतली.
चीनमध्ये प्राणघातक कोरोना विषाणूमुळे ११४ जणांच्या मृत्यूबरोबर मृतांचा आकडा २,११८ झाला आहे. यासह, संसर्गाची एकूण पुष्टी केलेली प्रकरणे वाढून ७४,५७६ वर गेली आहेत. चीनी अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
डिसेंबरमध्ये संसर्गाची पहिली नोंद झाली
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दैनंदिन नोंद झालेले घट कमी झाले असून ३९४ प्रकरणे नोंदली गेली. डिसेंबरमध्ये या संसर्गाची पहिली नोंद झाली. तेव्हापासून हा आकडा सर्वात कमी आहे.
एनएचसीने सांगितले की, बुधवारी ३१ प्रांतीय स्तरावरील भागात ११४ जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये एकूण ७४,५७६ रुग्णांची पुष्टी झाली आहे. आणि या प्राणघातक रोगामुळे २,११८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आयोगाने सांगितले की ४,९२२ लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. ते म्हणाले की हुबेई येथे १०८ आणि हुबेई, शांघाय, फुजियान, शनदोंग, युन्नान आणि शांक्सी येथे एक – एक व्यक्तीचा मृत्यू झाला.