मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (PMC) बँके घोटाळ्याप्रकरणी अनेक जणांवर चौकशीचे सत्र सुरु आहे. त्यात आता पीएमसी बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रजनीत सिंग यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW)अटक केली आहे. दरम्यान पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी ३ HDIL चे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या ह्या कारवाईत ३ हजार ५०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडून या घोटाळ्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांसाठी निर्बंध घातले. या बँकेच्या खातेदारांची खाती गोठवण्यात आली असून बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जसबीर सिंह मठ्ठा या तक्रारदात्याचे यांनी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकेचे अधिकारी आणि HDIL च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे ४ हजार ३५५ कोटींचं नुकसान झाले. या प्रकरणी बँकेचे माजी संचालक जॉय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि राकेश वाधवान, सारंग वाधवान यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, पीएमसी बँकेप्रमाणेच CBIने देशभरातल्
मात्र, याचा फटका गुंतवणूकदारांना बसणार आहे. ज्यामुळे सामान्य ठेविदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यात रिझर्व्ह बँकेनेही निर्बंध आणल्याने अनेक बँकांमध्ये लोकांना पैसे काढणही अवघड झालं. अश्या परिस्थिती लोकांचा बँकिंग सिस्टिमवरचा विश्वासच उडण्याची भिती असल्याने सर्वच बँकांनी आपल्या व्यवहारात पारदर्शकता आणावी असे निर्देश रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले होते.