नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सोमवारी एक आश्चर्यकारक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ते सोशल मीडिया सोडण्यावर विचार करत आहेत. या रविवारी (8 मार्च) ला मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसह माझे सर्व सोशल मीडिया अकाउंट सोडण्याचा विचार आहे. याबाबत मी तुम्हाला माहिती देईन, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर विविध अकाउंटवर सर्वात जास्त फॉलो केले जाणारे नेते आहेत. ते नेहमी सोशल मीडियाद्वारे जगभरातील लोकांशी संपर्कात राहतात. ट्विटरवर त्यांचे 5 करोड 33 लाख 70 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर ते स्व:ता 2373 लोकांना फॉलो करत आहेत. अशाप्रकारे फेसबुकवर त्यांच्या पेजवर 4 करोड 47 लाखपेक्षा जास्त लाईक आहेत. यूट्यूबवर पीएम मोदी यांचे 45 लाख फॉलोअर्स आहेत. याशिवाय इन्स्टाग्रामवर सुद्धा 3 करोड 52 लाख लोक पीएम मोदी यांना फॉलो करतात. नागरिकत्व दुरूस्ती कायद्यासह अनेक मुद्यांवर आपले विचार जनतेसमोर ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नेहमी सोशल मीडियाच्या व्यासपीठाचा वापर केला आहे.
प्रत्येक दोन तासाला एक ट्विट
एप्रिल, 2019 मध्ये इंडिया स्पेंड च्या एका रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक अकाउंटवरून मागील सहा महिन्यात प्रत्येक दोन तासाला एक ट्विट केले गेले आहे. ऑक्टोबर 2018 पासून मार्च 2019 दरम्यान पीएम मोदी यांनी 2143 ट्विट केले आहेत.
राहुल गांधी यांचा निशाना
तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, सोशल मीडिया नव्हे, द्वेष सोडा.