नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Mandhan Yojana | केंद्र सरकारकडून देशातील छोट्या आणि सीमांत शेतकर्यांसाठी प्रधानमंत्री मानधन योजना (PM mandhan yojana) पेन्शन योजना चालवली जात आहे. यामध्ये 60 व्या वर्षानंतर दरमहीना 3000 रुपयांची सुविधा दिली जाते. याबाबत जाणून घेवूयात सर्वकाही
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जेवढा प्रीमियम (Premium) शेतकरी देईल तेवढी रक्कम सरकार सुद्धा देईल. किमान प्रीमियम 55 आणि कमाल 200 रुपये आहे. मधूनच कुणी पॉलिसी सोडली तर जमा रक्कम आणि व्याज (Interest) त्या शेतकर्याला मिळेल. जर त्या शेतकर्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 1500 रुपये दरमहिना मिळतील.
पैसे न देता सुद्धा घेऊ शकता योजनेचा लाभ
जर एखादा शेतकरी पीएम किसान सम्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) चा घेत असेल तर त्याला यासाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाहीत. या योजनेंतर्गत शेतकरी पीएम किसानमधून प्राप्त लाभातून थेट अंशदान करण्याचा पर्याय निवडू शकतो. अशाप्रकारे त्यास थेट आपल्या खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत.
कोण घेऊ शकतात या योजना फायदा
– 18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो.
– यासाठी तुमच्याकडे कमाल 2 हेक्टेरपर्यंत शेतीयोग्य जमीन असावी.
– किमान 20वर्ष आणि कमाल 40 वर्षापर्यंत 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मासिक अंशदान करावे लागेल, शेतकर्याच्या वयावर अवलंबून आहे.
– जर 18 व्या वर्षी सहभाग घेतला तर मासिक अंशदान 55 रुपये असेल.
– जर 30 व्या वर्षी सहभाग घेतला तर 110 रुपये जमा करावे लागतील.
– तुम्ही 40 च्या वयात सहभागी झालात तर दरमहिना 200 रुपये जमा करावे लागतील.
केसीसीचा सुद्धा मिळेल लाभ
या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकर्यांना मिळत आहे जे पीएम किसान सम्मान निधीचा लाभ घेत आहेत. पीएम किसानच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा सुद्धा लाभ देते.
Web Title : PM Mandhan Yojana | pradhan mantri kisan mandhan yojana invest only 55 rupees per month and get 3000 rupees monthly
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update