नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Samman Nidhi Scheme । शेतकऱ्यांना काही अनुदान मिळावं यासाठी केंद्र सरकारने (Central Government) पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Scheme) जाहीर केलं आहे. या योजनेमधून शेतकऱ्याला वार्षिक तीन हप्ते म्हणजेच 6 हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळतो. आतापर्यंत या योजनेचे 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले गेले आहे. तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे पीएम शेतकरी सन्मान निधीयोजनेचं उद्दिष्ट्य आहे. दरम्यान आता नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवले जाणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Scheme) याअंतर्गत मिळणार लाभ हा कुटूंबातील एकाच सदस्याला मिळतो. परंतु जर का कुटूंबातील दोन्ही अर्थात पती, पत्नीला मिळत असेल तर, मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल केली जाऊ शकते. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात पती आणि पत्नी दोघांनी पीएम शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे.
कधी मिळतात पैसे ?
2019 च्या मोदी सरकारच्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Scheme) याअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6 हजार रुपये 3 हप्त्यांमध्ये पाठवले जातात. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवण्यात येतोय.
आतापर्यंत आलेले हप्ते ?
पहिला हप्ता : फेब्रुवारी 2019
दुसरा हप्ता : एप्रिल 2019
तिसरा हप्ता : ऑगस्ट 2019
चौथा हप्ता : जानेवारी 2020
पाचवा हप्ता : एप्रिल 2020
सहावा हप्ता : ऑगस्ट 2020
सातवा हप्ता : डिसेंबर 2020
आठवा हप्ता : एप्रिल 2021
Web Title :- pune crime strong action against criminals in loni kalbhor area by pune police commissioner amitabh gupta
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update