पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये (Pune Corona) 276 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 310 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 84 हजार 356 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 72 हजार 839 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8702 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
PM Kisan | कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये, नववा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार
पुण्यात 2815 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2815 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 229 रुग्ण गंभीर आहेत. तर 389 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7178 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 27 लाख 99 हजार 187 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title : Pune Corona | 276 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update