मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Teacher Eligibility Test | कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर अनेक व्यवहार ठप्प झाला. यामुळे अनेक शासकीय, निमशासकीय, तसेच खासगी पदे भरण्यास तूर्त थांबवलं गेलं. या वळणानंतर आता राज्य सरकारने (State Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाने राज्यातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील शिक्षक भरतीचा (Teacher recruitment) मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra Teacher Eligibility Test) घेण्याचा शिक्षण विभागाने महत्वाची घोषणा केली आहे. महारष्ट्रातील अंदाजे 40 हजार शिक्षकांची रिक्त असलेल्या पदांची भरती केली जाणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यंदाच्या सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी (MAHA TET- 2021) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. तब्बल 2 वर्षांनंतर ही परीक्षा होणार आहे. याअगोदर 2018-19 साली अखेरची परीक्षा घेतली होती. 1 ली ते 4 थी आणि 5 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य असणार आहे. असं सांगण्यात आलं आहे.
या दरम्यान, जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार,
आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे तेरा हजार अशी 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार असल्याचं म्हटलं आहे.
Web Title :- Maharashtra Teacher Eligibility Test | 40000 teachers will be recruited in the state the governments green signal
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update