पिंपरी क्राईम न्यूज (Pimpri Crime News) : बहुजननामा ऑनलाईन – मागील आठवड्यात वाढदिवस झाल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी लोणावळ्याच्या (lonavala) कुसगाव परिसरात (Kusgaon area) फिरण्यासाठी पाच मित्र गेले होते. त्यावेळी खाणीत बुडून वाढदिवस झालेल्या तरुणासह एकाचा मृत्यू (Death) झाला. हि घटना गुरुवारी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. घडली असुन आकाश गुरव (Akash Guru) आणि धिरेंद्र त्रिपाठी (Dhirendra Tripathi) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. Pimpri Crime News | Birthday Boy Along with A Youth Drown In Lonavala During Celebration.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मागील आठवड्यात पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) राहणाऱ्या आकाश गुरवचा वाढदिवस होता. त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी आकाश त्याच्या मित्रांसह लोणावळ्याच्या कुसगाव परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, आकाश आणि धिरेंद्र हे दोघे ही खाणीत पोहण्यासाठी उतरले तेव्हा, त्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहचले दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. याबाबतची नोंद लोणावळा ग्रामीण पोलिसात (Lonavla Rural Police) झाली आहे.
Web Titel :- Pimpri Crime News | Birthday Boy Along with A Youth Drown In Lonavala During Celebration
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू
Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु