नाशिक न्यूज (Nashik News) : बहुजननामा ऑनलाईन – पुणेकर असलेल्या एका सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकार्यांसोबत मोबाईलवर चॅटिंग (Mobile Chating) करुन सातत्याने मेसेज (Massage) करुन जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न धुळ्याच्या एका तरुणाला चांगलाच अंगलट आला आहे (Crime Incident). पुण्यातील (Pune) काही जणांनी धुळे (Dhule) गाठून या तरुणाचे अपहरण (Kidnap) करीत त्याला नाशिकला (Nashik) आणले. तेथे त्याचे चक्क मुंडन केले. या सर्व प्रकारामुळे उडालेल्या गोंधळाची माहिती एका दक्ष नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला (Police Control Room) दिली. नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यातील (Panchavati Police Station Nashik) पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी (Police Officers and Staff) या प्रकरणी ५ जणांना अटक (Arrest) केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
विलास चव्हाण (वय १८, रा. धुळे) याने पंचवटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जयसिंगकौर तेजिंदरसिंग छाबडा (वय ३४), निलेश सुरेश जाधव (वय ३९, रा. लक्ष्मीनगर), राहुल निंबाळकर (वय ३३, रा. हॅपी कॉलनी), सागर शिवाजी गायकवाड (वय ३१) आणि एका महिलेला अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी, विलास चव्हाण (Vilas Chavan) याने एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी महिलेसोबत मोबाईलवरुन बोलणे आणि चॅटिंग करत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने ही बाब आपल्या सहकार्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी धुळे शहर गाठले. विलास चव्हाण ((Vilas Chavan)) याला घराबाहेर बोलविले. त्याला पकडून हात पाय बांधून मोटारीत टाकले व त्याला थेट नाशिकमध्ये आणले. येथील पंचवटी (Panchavati) भागातील फुलेनगर (Fulenagar) या भागात बुधवारी सकाळी एका सलूनच्या दुकानात (salon shop ) चव्हाण याला ते घेऊन गेले. तेथे त्याचे त्यांनी जबरदस्तीने मुंडण केले. यावेळी सकाळी सकाळी होत असलेला आरडा ओरडा व मारहाणीमुळे काही तरी वेगळा प्रकार घडत असल्याचे येथील एका नागरिकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने ही बाब पंचवटी पोलिसांना (Panchavati Police) कळविली.
पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchavati Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत (Senior Police Inspector Ashok Bhagat) व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने फुलेनगर गाठले.
मिळालेल्या नंबरवरुन त्यांनी ही मोटार चारही बाजूने ब्लॉक केली.
त्यातील सर्वांना ताब्यात घेत गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारही जप्त करण्यात आली आहे.
Web Titel :- Nashik Crime News | expensive talk woman pune young man dhule was brought nashik and shaved
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Crime News | वाढदिवसाचं सेलिब्रेशन जीवावर; लोणावळ्याच्या खाणीत बुडून दोघांचा मृत्यू