पिंपरी :बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Crime News । भोसरी (Bhosari) येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना (13 जुलै) मंगळवारी घडली आहे. तेजस सूर्यकांत तावरे (वय, 23 रा. भोसरी, मूळ रा. लिंगी पिंपळगाव, जि. उस्मानाबाद) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पेट्रोलपंप मालकाला पोलिसांकडून (Pimpri Crime) अटक करण्यात आली आहे. गणेश सुरेश लांडगे (वय, 28 रा. इंद्रायणीनगर, भोसरी), असं अटक केलेल्या पेट्रोलपंप मालकाचे नाव आहे.
https://t.me/bahujannam
याबाबत अधिक माहितीनुसार, याप्रकरणी अमरजा सचिन पालकर (रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली), यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) याबाबत फिर्याद दिली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील सदगुरुनगर येथे लक्ष्मी एनर्जी ॲण्ड फ्यूल पेट्रोल पंप आहे. आरोपी गणेश लांडगे (Ganesh Landage) हा या पंपाचा मालक आहे. त्या पंपावर मृत तेजस तावरे (Tejas Taware) यानं पैशांची अफरातफर केल्याचे म्हणत आरोपी लांडगे यांनी तेजस याला बोलावून घेतले. नंतर त्याने त्याच्या ऑफिसमध्ये तेजसला मारहाण केली. आणि त्याची दुचाकी, मोबाइल आरोपीने काढून घेतला. यांनतर तुझ्या आईवडिलांना फोन करून सांगून पोलीस केस करतो, अशी धमकी आरोपी गणेश लांडगेने दिली. तेजस याच्यावर आरोपीने दबाव टाकून त्याला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केले.
दरम्यान, तेजसने आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्याला
रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू (Death) झाला. तेजसने
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. मृत तेजस याची बहीण अमरजा पालकर यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी गणेश लांडगे याला पोलिसांनी अटक (Arrested) केलीय.
web title: Pimpri Crime News | Bhosari youth commits suicide by hanging; Petrol pump owner arrested.
Parambir Singh | …म्हणून परमबीर सिंग यांनी ‘सिक लिव्ह’ वाढवली
Pimpri Crime | वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्याच्या अंगावर सोडले कुत्रे