पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | फेसबुकच प्रेम अन् त्याच माध्यमातून न्यूड फोटो व व्हिडीओ काढल्यानंतर (Nude photos and videos) ते व्हाट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status) ठेवून प्रदर्शन करत 1 कोटी रुपयांची मागणी (Demand for Rs 1 crore) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर बलात्कारासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime | Demand of Rs 1 crore for removing nude photos and videos of a 34-year-old woman from Pune; FIR at Wanwadi Police Station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी सौरभ सुभाषचंद्र सुखिजा (वय 31, रा. पंजाब) याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 34 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. हा प्रकार 2019 ते 2021 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर दोघांची ओळख झाली होती. मेसेंजरवर दोघे बोलू लागले. त्यात त्यांचे सूत जुळले. त्यानंतर त्याने पीडित महिलेचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ तयार केले. तसेच, हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन मनाविरुद्ध शारीरिक संबंध (Physical contact) निर्माण केले. तर फोटो आणि व्हिडीओ स्टेट्सला ठेवून प्रसारित केले. तर त्यांचे 2 तोळ्यांचे मंगळसूत्र चोरून नेले. त्यानंतर मंगळसूत्र, फोटो व व्हिडीओ परत देण्यासाठी 1 कोटींची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.
Web Title : Pune Crime | Demand of Rs 1 crore for removing nude photos and videos of a 34-year-old woman from Pune; FIR at Wanwadi Police Station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update