पिंपरी (Pimpri News) : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri News | ६२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला भावनिक साद घालून त्यांच्याकडे घरखर्चासाठी पैशांची मागणी करुन जवळीक साधल्यावर ब्लॅकमेल (Blackmail) करुन १८ लाख रुपये एका महिलेने लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेली ४ वर्षे हा प्रकार सुरु होता. शेवटी संत तुकारामनगर येथील या ज्येष्ठ नागरिकाने ई मेल करुन पोलिसांना याची माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी किवळे येथील विकासनगरमध्ये राहणार्या एका ३४ वर्षाच्या महिलेविरुद्ध खंडणीचा (Ransom) गुन्हा दाखल (Pimpri Crime) केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने संत तुकारामनगरमध्ये राहणार्या एका ज्येष्ठ
नागरिकाला भावनिक साद घालून वेळोवेळी घरखर्चासाठी पैशांची मागणी करुन आईचे पेन्शनचे पैसे
आल्यावर परत करेन. तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाल्यानंतर परत करेन असे सांगितले. त्यातून तिने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधली. त्यानंतर त्यांच्याकडे जास्त रक्कमेची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपी महिलेने बदनामी करुन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. ई मेल तसेच फोनवरुन वारंवार पैशांची मागणी केली. हा प्रकार गेले चार वर्षे चालू होता. या काळात या महिलेने फिर्यादीकडून तब्बल १८ लाख रुपये घेतले. तरीही बदनामी करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी ती करत असल्याने शेवटी त्यांनी धीर करुन पोलिसांकडे ई मेलद्वारे तक्रार केली आहे. पिपंरी पोलिसांनी या महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title : pimpri news blackmailed a 62 year old man and stole rs 18 lakh a 34 year old woman from kiwle has been charged with extortion
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update