पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात मृतांची संख्याही वाढत आहे. बुधवारी शहरामध्ये सर्वाधिक 41 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांबरोबरच मृतांची संख्या वाढत असल्याने शहराचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरामध्ये आज दिवसभरात 1131 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरात 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 881 वर पोहचली आहे.
पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 1131 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 38 हजार 821 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 1131 रुग्णांपैकी 1105 हे शहरातील आहेत. तर 26 रुग्ण शहारा बाहेरील असून शहराबाहेरील 528 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 80 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 17 तर हद्दीबाहेरील 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांचा आकडा 881 वर पोहचला आहे. यामध्ये 736 रुग्ण शहरातील तर 145 रुग्ण शहराबाहेरील आहेत.
आज दिवसभरात 371 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 25 हजार 770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 6631 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये निगडी, आकुर्डी, चिंचवड, मोशी, वल्लभनगर, जुनी सांगवी, चिखली, थेरगाव, मासुळकर कॉलनी, कासारवाडी, अजमेरा, कल्याण, खेड, जुन्नर, सोमाटणे येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.