पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा पुणे शहरात वाढताना दिसत आहे. सलग दुसर्या दिवशी कोरोनाच्या नव्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासामध्ये कोरोनामुळं पुणे शहरातील 33 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहराबाहेरील 9 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 1882 मृत्यू झाले आहेत. दिवसभरात कोरोनाचे 1669 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 1386 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 79037 वर पोहचली आहे. सर्वात महत्वाची आणि समाधानाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 62349 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 14806 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 802 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 486 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.