पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरातील दुचाकी चोऱ्या करणाऱ्या तिघा सराईतांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ४ हजार रूपयांच्या 4 दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. नविद युनूस तांबोळी (वय ३०), अल्फान अजिज मुजावर (वय २२, रा. दोघेही रा. सय्यदनगर, हडपसर), आणि भुजंग निवृत्ती सूर्यवंशी (वय ४०, रा. मुखखेड, नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शहरात वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. वानवडी पोलिसांनी सीसीटीव्हीतील फुटेजनुसार चोरट्यांचा तपास सुरु केला होता. त्यावेळी संबंधित वाहनचोर महंमदवाडी रोडवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नविद, अल्फान, भुजंगला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वाहनचोरीचे चार गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस निरीक्षक सलीम चाउस, सहायक निरीक्षक आसाराम शेटे, उपनिरीक्षक अभिजीत जोगदंड, राजू सासगे, आनंद पाटोळे, योगेश गायकवाड, संभाजी दिवेकर, महेश भोंगळे, सचिन गवळी, नवनाथ खताळ, नासीर देशमुख, महेंद्र कांबळे, अनुप सांगळे, सुदर्शन म्हांगरे, अजिंक्य नानगुडे यांच्या पथकाने केली.