पिंपरी न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (Corona) नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली. परंतु गेल्या 24 तासात शहरात बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 170 नवीन रुग्ण (Pimpri-Chinchwad Corona) आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 170 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 62 हजार 999 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 191 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 57 हजार 579 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 095 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी (दि.22) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 2244 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 9 लाख 51 हजार 105 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri-Chinchwad Corona | 170 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 333 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी