पुणे : बहुजननामा ऑनलाईन – टोळी युध्दातून (Pune Crime) कुख्यात गुंड संदीप मोहोळ यांच्या खून प्रकरणात (sandeep mohol murder case) मोक्का न्यायालयाचे (mcoca special court) न्यायाधीश ए. एन. शिरसीकर (Judge A.N. Shiriskar) यांनी तिघांना जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा (Pune Crime) सुनावली आहे. या गुन्ह्यातील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन निवृत्ती पोटे (Sachin Nivrutti Pote), जमीर मेहबूब शेख (Jamir Shaikh), संतोष रामचंद्र लांडे (Santosh Lande) यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मोहोळ याचा 4 ऑक्टोबर 2006 रोजी पौड फाटा येथे गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने गणेश मारणे (Ganesh Marne), सचिन पोटे (Sachin Pote) आणि इतर अशा एकूण १८ जणांना अटक केली होती. त्यातील गणेश निवृत्ती मारणे (Ganesh Nivrutti Marne), संजय महिपती कानगुडे, समीर मेहबूब शेख, सोपान सचिन मारणे, राहुल रामचंद्र तारू, अनिल वाघू खिलारे, विजय महिपती कानगुडे, शरद तुकाराम विटकर, नीलेश किसन माझीरे, राहील मेहबूब शेख, दत्तात्रेय धोंडीबा काळभोर, दीपक किसन मोकाशी या १२ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पांडुरंग विठ्ठल मोहोळ, दिनेश खडकसिंग आवजी आणि इंद्रनील चंद्रभूषण मिश्री या तीन आरोपींचा खटला सुरू असताना मृत्यू झाला आहे.
मारणे टोळीतील अनिल मारणे याचा 2005 मध्ये टोळी युद्धातून संदीप मोहोळच्या टोळीतील गुंडांनी खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी 2006 साली संदीप मोहोळ (sandeep mohol) याचा पौड रोड परिसरात खून करण्यात आला होता, असे पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते. सरकारी वकील म्हणून तत्कालीन जिल्हा सरकारी वकील अॅड. उज्ज्वला पवार (Adv. Ujwala Pawar), ॲड. विलास पठारे (Adv. Vilas Pathare) यांनी काम पाहिले. तर आरोपींकडून अॅड. सुरेशचंद्र भोसले (Adv, Suresh Chandra Bhosale), ॲड. डॉ. चिन्मय भोसले (Dr. Chinmay Bhosle), अॅड. सुधीर शहा (Adv. Sudhir Shah), अॅड. हर्षद निंबाळकर (Adv. Harshad Nimbalkar), ॲड. एन. डी. पवार (Adv. N. D. Pawar), ॲड. संदीप पासबोला (Adv. Sandeep Pasbola), अॅड. राहुल वंजारी (Adv. Rahul Vanjari), अॅड. अतुल पाटील (Adv. Atul Patil), अॅड. धैर्यशील पाटील (Adv Dhairyashil Patil), अॅड. जितेंद्र सावंत (Adv, Jitendra Sawant), अॅड. राहुल भरेकर (Adv. Rahul Bharekar), अॅड. विपुल दुशिंग (Adv. Vipul Dushing) यांनी बाजू मांडली.
Web Title :- Pune Crime | Three sentenced to life imprisonment in 2006 Sandeep Mohol murder case in Pune; acquittal of 12 persons
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 333 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी