बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अरबाज खान (Arbaaz Khan) याची गर्लफ्रेंड आणि इटालियन मॉडेल व बॉलिवूड अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) ही आपल्या हॉट फिगर, फिटनेस आणि फोटोंमुळं कायमच चर्चेत येत असते. आपल्या काही बोल्ड फोटोंमुळं जॉर्जिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
जॉर्जियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जॉर्जिया खूपच स्टनिंग आणि बोल्ड दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनीही यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांना तिचा हा अवतार खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत आहे. दोघंही अनेकदा क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात.
जॉर्जिया लवकरच वेलकम टू बजरंगपूर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात श्रेयस तळपदे संजय मिश्रा आणि तिग्मांशू धूलिया प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय ती अरबाज खान आणि प्रिया प्रकाश वॉरियर अभिनित बहुप्रतिक्षित श्रदेवी बंगलो मध्ये आयटम नंबर करताना दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CC_fDJ1FzMN/
https://www.instagram.com/p/B9i8W8bFpFf/
https://www.instagram.com/p/B05We22FAgd/
https://www.instagram.com/p/B0S4HtCl1YU/