बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यपाल(Governor ) भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) ही चांगली व्यक्ती आहे. ते राज्यपाल(Governor ) नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नावाला (mlc-recruitment) विरोध करणार नाहीत, असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal ) यांनी लगावला आहे.
एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना भुजबळ यांनी हा टोला लगावला. राज्यपालांकडे काही सदस्यांची नावे पाठवण्यात आली आहेत. राज्यपाल हे चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे ते या नावांना विरोध करतील असे वाटत नाही, असे सांगतानाच काही पक्षांची नावेही मुख्यमंत्र्यांकडे आल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.राज्यात दिवाळीत फटाके न वाजवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यावरही भुजबळ यांनी भाष्य केले आहे. राज्यात फटाक्यांवर बंदी नाही. मात्र फटाके न वाजवण्याचे आवाहन केले आहे. फटाक्यांचा धूर कोरोनाग्रस्तांसाठी हानीकारक ठरू शकतो. त्यामुळे हे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशन नागपूरला होऊ नये ही तेथील आमदारांची इच्छा
यंदा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार नसल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केले. नागपूरच्या आमदार निवासात कोव्हिड सेंटर उभारलेले आहे. त्यामुळे नागपूरच्याच आमदारांनी नागपूरमध्ये अधिवेशन घेऊ नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अधिवेशन कुठे घ्यायचे हे बिझनेस अॅडव्हाझरी कमिटी निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिवाळीत काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला.