बहुजननामा ऑनलाइन टीम – लागोपाठ 29व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price)दर स्थिर राहिल्यानंतर काल 30व्या दिवशी किंमतीमध्ये वाढ करण्यात आली. आज पुन्हा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. 7 जानेवारीला मुंबईत डिझेल 81.07 रुपये आणि पेट्रोलचा रेट 90.83 रुपये आहे. देशभरात पेट्रोलचे दर 21 ते 24 पैशांपर्यंत आणि डिझेलचे दर 26 ते 29 पैशांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
पुणे 90.57 – 79.54
औरंगाबाद 91.25 – 80.25
धुळे 91.34 – 80.36
कोल्हापूर 90.79 – 79.84
नाशिक 91.00 – 80.02
रायगड 90.41 – 79.42
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टी मिळवल्यानंतर दर जवळपास दुप्पट होतात. जर केंद्र सरकारची एक्साइज ड्यूटी आणि राज्य सरकारांचा वॅट हटवला तर डिझेल आणि पेट्रोलचा रेट जवळपास 27 रुपये लीटर राहिल, परंतु केंद्र असो की राज्य सरकार, दोन्ही कोणत्याही स्थितीत टॅक्स कमी करत नाहीत. कारण महसूलाचा एक मोठा भाग येथून येतो.
प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.
एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.
कंपनी आणि क्रमांकाची सुविधा
1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249
2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222
3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122
वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता