बहुजननामा ऑनलाइन टीम – देशातील सर्वात आनंदी शहराची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पुणे शहराने 12 वा क्रमांक पटकावला(happiest cities ) आहे. विशेष म्हणजे, पुणेकरांनी आनंदी राहण्याच्या बाबतीत मुंबईकर आणि नागपूरकरांनाही मागे टाकले आहे. आनंदी शहरांची निवड वयोमान, शिक्षण, कमाई आणि एकंदरीत एखाद्या शहरात राहताना तिथे मिळणाऱ्या सुखसोयी व जीवनशैली यांच्या आधारावर यादी तयार करण्यात आली आहे.
‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट 2020 मध्ये देशातील आनंदी शहराची 25 नावांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. पुण्याला 12 वा, नागपूर, 17 व मुंबईला 21 वे स्थान देण्यात आले आहे. प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान देशभरातील विविध शहरांमध्ये 13 हजार लोकांहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन यादी तयार केली आहे. राजेश पिल्लानिया हे गेल्या दशकभरापासून व्यवस्थापनातील संशोधनाचे काम करत आहेत.
पहिल्या तीन स्थानावर कोणती शहर?
आनंदी शहरांच्या यादीत लुधियाना, अहमदाबाद आणि चंदीगड या शहरांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय, आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर टू-टियर शहरांमध्ये अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली सर्वाधिक आनंदी शहरे ठरली आहेत. विशेष म्हणजे महत्वाची बाब म्हणजे मोठ्या शहरांमध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा अधिक आनंदी असल्याचेही दिसून आले आहे.