नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅनकार्ड कोणत्याही व्यक्तीचे नागरीकत्व दाखवण्याचे कागदपत्र नसल्याचे गुवाहाटी हायकोर्टाने त्यांच्या एका निर्णयात म्हटले आहे. एका महिलेची याचिका फेटाळताना कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे. पॅनकार्ड कोणत्या – कोणत्या कामांसाठी वापरले जाते, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल पण पॅनकार्ड देशाच्या प्रत्येकी टॅक्सपेयरकडे असते. याबाबत खूपच कमी लोकांना माहित आहे.
इन्कम टॅक्स कलम १९६१ अंतर्गत आयकर विभागाद्वारे पॅनकार्ड दिले जाते. पॅनकार्डवर एक दहा अंकी क्रमांक अल्फान्यूमरिक कोड असतो. पॅनकार्ड व्यक्ती, फर्म, कंपनी, व्यक्तींची संघटना, संस्था, हिंदू अविभाजित परिवार, सहकारी समित्या, सरकारी संस्था, आर्टिफिशिअल न्यायिक व्यक्ती, स्थानीय प्राधिकरण, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ट्रस्ट आणि टॅक्सपेयरसाठी महत्वाचे आहे.
आयकर रिटर्न भरताना पॅनकार्ड नंबर वापरला जातो. आयटीआर दाखल करताना पॅनकार्ड महत्वाचे असते. जर तुम्ही कोणत्या बँकेत खाते उघडले तर तुम्हाला पॅनकार्ड गरजेचे असते. कोणत्याही बँकेतील सेविंग खाते किंवा चालू खाते असेल तर पॅनकार्डची गरज असते. जर तुम्ही बँक किंवा दुसऱ्या वित्तीय संस्थेत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हाही तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर देणे गरजेचे असते.
जर तुम्हाला ५ लाख रु. पेक्षा जास्त किंमतीची गाडी खरेदी करायची असेल तर जुन्या कारच्या खरेदीसाठी आपली पॅनकार्ड माहिती द्यावी लागते. विमा धारकाला कोणत्याही आर्थिक वर्षात ५० हजारपेक्षा जास्त रक्कम प्रीमियमच्या रूपात जीवन विम्यासाठीही पॅनकार्डची गरज असते. तसेच पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या स्थावर मालमत्ता खरेदी करायला किंवा विकायला पॅनकार्डची गरज असते.