नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही अजूनही तुमचे पॅनकार्ड आधारसोबत लिंक केले नसेल तर लवकर लिंक करून घ्या, नाहीतर तुम्हाला खूप मोठा दंड बसू शकतो. ३१ मार्चच्या अगोदर आपले पॅनकार्ड आधारसह लिंक केले नाही तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्यावर १० हजार रुपयाचा दंड देऊ शकतो. तुमच्यावर हा दंड निष्क्रिय नंबर वापरल्याबद्दल केल्यामुळे लागेल.
इन्कम टॅक्स विभागाने म्हटले आहे की, डेडलाईन नंतर जितके पॅनकार्ड होल्डर्सला आपले पॅनकार्ड आधारशी लिंक करायचे नसेल, त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय घोषित केले जाईल. आता विभागाकडून लिंक ना करणाऱ्या लोकांना इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत पॅन न ठेवल्याच्या आरोपात दंड भरावा लागू शकतो.
कायदा काय म्हणतो?
नियमांतर्गत जर तुमचे पॅन निष्क्रिय झाले असेल तर असे मानले जाईल की कायद्याअंतर्गत तुम्ही पॅन दिलेले नाही. अशात तुमच्यावर इन्कम टॅक्स कलम २७२बी अंतर्गत १० हजार रुपयांचा दंड बसू शकतो. कलम १३९ए अंतर्गत पॅनकार्ड मागितले तर ते दाखवणे आवश्यक आहे.
जर तुम्ही बँक खाते उघडण्यासाठी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सारख्या अर्ज करणे यासारख्या गोष्टींसाठी पॅन दाखवले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. पण जर आपल्याकडे निष्क्रिय पॅन आहे आणि आपल्या बँक खात्यात कोणतेही ट्रांजॅक्शन झाले तर त्यावर इन्कम टॅक्सचे लक्ष पडते. ज्यामुळे तुमची अडचण वाढेल. जर आपण आपल्या बँक खात्यातून ५० हजार पेक्षा जास्त पैसे काढले किंवा ठेवले असेल तर आपल्याला पॅन कार्ड दाखवावे लागेल.