नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून पॉजिटीव्ह जागतिक संकेतांमुळे सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्राम सोन्याच्या भाव ३९१ रु.नी वर गेला आहे. सोन्यासह चांदीचाही भाव वाढला असून एक किलोग्राम चांदी ७१३ रुपयांनी महागली आहे. मागच्या आठवड्यात शुक्रवारी सोने २२२ रु. स्वस्त तर चांदी ६० रु. कमी झाली होती.
काय आहे सोन्याचा नवीन भाव?
राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याची किंमत ४२,२२५ रु. पासून वाढत ४२,६१६ रु. प्रति १० ग्राम झाली. शुक्रवारी सोने ४२,२२५ रु.ला बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,६०४ डॉलर प्रति औस आणि चांदी १७ डॉलर प्रति औस होती.
काय आहे चांदीची नवीन किंमत?
सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत ४५,५०० रु. पासून वाढत ४६,२१३ रु. प्रति किलोग्रॅम होती.
का वाढली आहे सोन्याची किंमत?
HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ अनॅलिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. ज्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव वाढला असून मागच्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत घट झाली होती.
येथे खरेदी करा बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने
स्वस्तात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी असून सॉवरेन गोल्ड बॉण्डची नवीन सिरीज सोमवारी २ मार्च २०२० ला लाँच होणार आहे. यात तुम्ही ६ मार्च २०२० पर्यंत गुंतवणूक करू शकता. सोन्याचा वाढलेल्या किंमती दरम्यान मोदी सरकारने सॉवरेन गोल्ड बॉण्डची १० वी सिरीज सादर केली असून त्यात इश्यू किंमत ४,२६० रु. प्रति ग्राम निश्चित केली गेली आहे. यात गुंतवणूक करून तुम्हाला व्याजही मिळू शकते. याशिवाय ऑनलाईन खरेदीवर सरकार ५० रु. पर्यंत सूट देत असून गुंतवणूकदारांना ११ मार्च २०२० पर्यंत बॉण्ड मिळून जाईल.