बहुजननामा ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींना धमकावणाऱ्या पाकिस्तानी पॉप गायक रबी पिरजादा हिचे वाईट दिवस आता सुरू झाले असून ती तुरूंगात जाण्याची शक्यता आहे. लाहोरमधील ब्युटी सलूनमध्ये विदेशी जनावरांना पाळीव प्राणी म्हणून ठेवल्याबद्दल या पाकिस्तानी पॉप स्टारविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.
Here u go https://t.co/WBwjCJXwFp
— Rabi Pirzada (@Rabipirzada) September 5, 2019
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या वन्यजीव संरक्षण व फलोत्पादन विभागाने रबी पिरजादाच्या ब्युटी सलूनमध्ये विदेशी जनावरे ठेवण्यास कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. वन्यजीव कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दलही विभागाने लाहोरच्या स्थानिक न्यायालयात रबी पीरजादाविरूद्ध याचिका दाखल केली आहे.
दरम्यान रबी पिरजादा यांनी पंतप्रधान मोदींना अजगर आणि अनेक सापांसह व्हिडिओ बनवून धमकावले होते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्याच्या भारत सरकारच्या निर्णयाने तिला धक्का बसला होता आणि ती म्हणाली, ‘मी, एक काश्मिरी महिला, भारतासाठी मी सापांसह तयार आहे ‘ही भेट खरोखर मोदींसाठी आहे.’
रबी पिरजादाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती अजगर आणि मगरीसोबत दिसली होती. ती म्हणत होती- ‘मी, काश्मिरी मुलगी आपल्या सापांसह सज्ज आहे. हे सर्व नरेंद्र मोदींसाठी आहेत. तुम्ही काश्मिरींना त्रास देत आहात, म्हणून आता नरकात मरायला तयार व्हा. माझ्या सर्व मित्रांना शांतता हवी आहे.
रबी हि पाकिस्तानातील एक पॉप गायक आहे आणि बर्याच टेलिव्हिजन शोजचे होस्टही केले आहे. २०१७ साली रबीचे नाव चर्चेत आले होते, जेव्हा तिने बॉलिवूड इंडस्ट्री आणि सलमानला विरोध केला होता. काश्मीर वादावर गाणे गाण्यामुळे रबी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती.