मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शनिवारी दुपारी काही यूजर्सने अक्षय कुमारच्या विरोधात ट्विट करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर ‘गॉड ऑफ लस्ट’ या नावाने अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अक्षयच्या विरोधात ‘कॅनेडियन’ आणि ‘माॅलेस्टर’ म्हणून ट्विट करू लागली. परंतु ट्विट करणारे बहुतेक प्रोफाइल खरे दिसत नसल्याचे समजले आहे.
एका वापरकर्त्याने ट्विट केले आहे की, “ काही अभिनेत्रीची यादी आहे ज्यांचा या कॅनेडियन अक्षय कुमारने विनयभंग केला आहे. शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, प्रियंका चोप्रा, मौनी रॉय, वहीदा रहमान, जायरा वसीम, कियारा. अगदी त्याच्या सासू डिंपल कपाडियाचा विनयभंग केला आहे. या वासनेच्या देवतेला बाहेर काढून टाकण्याची वेळ आली आहे.”
आणखी एका यूजर्सने ट्विट केले, “तर हा तथाकथित देशभक्त राष्ट्रवादी कॅनेडियन ‘गॉड ऑफ लस्ट अक्षय’ एक माॅलेस्टर आहे.” तर कोणीतरी ट्विट केले आहे की, “हा कॅनेडियन अक्षय कुमार सर्वात मोठा माॅलेस्टसर आहे. अक्षय हा वासनेचा देव आहे. ”
त्याचप्रमाणे अजून एका यूजर्सने ट्विट केले होते कि, “हा कॅनेडियन अक्षय कुमार केवळ आमचे पैसे लुटत आहे , शौचालयासाठी गोरगरीबांचा अपमान करीत आहे. तर केवळ मासिक पाळीच्या कारणावरून महिलांचा अपमान करतो, आपल्या वैज्ञानिकांचा अपमान करतो, एवढेच नव्हे तर आमच्या ध्वजाचा अपमान केल्याने, हा एक मोठा माॅलेस्टर आहे. अक्षय हा वासनेचा देव आहे.”
शनिवारी पत्रकार परिषदेच्या वेळी अक्षयने या ट्रोलिंगवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अभिनेता-निर्माता के.आर.के.अक्षयला सोबत उभे असल्याचे दिसून आले, ते या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देत म्हणाले कि , “लोक ‘वासनेचे देव अक्षय’ असे ट्रोल का करतात हे मला खरंच समजत नाही?” जर लोकांना असे म्हणायचे असेल की तो कॅनेडियन आहे तर ते ठीक आहे कारण तो आहे, परंतु लोकांनी अशा अश्लील शब्दांत त्याला ट्रोल करू नये.”
दरम्यान अक्षयचे बरेच चित्रपट या दिवाळीपासून एक-एक करून येणार आहेत. ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट दिवाळीत रिलीज होत आहे, यावर्षी ख्रिसमसवर ‘गुड न्यूज’ येत आहे, ‘लक्ष्मी बॉम्ब’ पुढच्या वर्षी ईदला रिलीज होईल आणि अक्षय पुढच्या वर्षी दिवाळीनिमित्त ‘पृथ्वीराज’ रिलीज करण्याची योजना आहे. आणि यानंतर ‘बच्चन पांडे’ २०२० सालच्या ख्रिसमसवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.तसेच पुढील वर्षी २७ मार्च रोजी ‘सूर्यवंशम’ येत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा अक्षयचे करियर योग्य दिशेने वाटचाल घेत आहे. त्यावेळीच अक्षयची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे?