नायगाव बहुजननामा ऑनलाईन – लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याच्या हेतूने माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. मिनाक्षी कागडे, डॉ शिवाजी कागडे यांच्या वतीने अंजना हास्पिटल येथे मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वसंतनगर मर्चंट बॅंकेचे बाजूस नायगाव येथे दिनांक १ ऑगस्ट, २०१९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबीर पार पडणार आहे. या शिबिरात मराठवाड्यातील मधुमेह तज्ञ डॉ. महेश तळेगावकर, पोटविकार तज्ञ डॉ. अनिलकुमार देगांवकर, वातरोग व मधुमेह तज्ञ डॉ. पंकज अग्रवाल व तसेच जर्मनी देशात शिक्षण घेतलेले अस्थि व संधीरोग तज्ञ डॉ. अभिजित देशमुख हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
या शिबिरात नांव नोंदणी करणाऱ्या सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी इ.सी.जी, शुगर तपासणी,बी.पी. युरिन तपासणी, ब्लड ग्रुप, हायड्रोशिल, हारनिया, अपेंडिक्स, मूळव्याध, भगंदर, शरिरातील गाठी व आवाळु इ.ची तपासणी तज्ञ व अनुभवी डॉक्टर द्वारे करून त्यावर योग्य उपचार करण्यात येणार आहे.नांव नोंदणी शुल्क केवळ ५० रु ठेवण्यात आली आहे. नायगाव व परिसरातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे डॉ मिनाक्षी कागडे डॉ शिवाजी कागडे यांनी आवाहन केली आहे. ८५८१९०६३१८/ ९८२३०७२११६ या नंबर वर नांव नोंदणीसाठी संपर्क साधावा.