मुंबई बहुजननामा ऑनलाईन – मनसे प्रमुख राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी ते ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणीसाठी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर याच विषयावर राज ठाकरे काही दिवसांपुर्वी सोनिया गांधी यांना भेटले होते.
लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर सुमारे दीड महिन्यांनी राज ठाकरे राजकिय पटलावर उतरले आहेत. पुढील काळात होणाऱ्या निवडणूका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात असं निवेदन त्यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.
ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सुरु असलेल्या राजकिय वार सर्वश्रुतच आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ममता बॅनर्जी यांना ईव्हीएमचा मुद्दा घेऊनच भेटणार असल्याचे समोर आले आहे.