हैद्राबाद बहुजननामा ऑनलाईन – आपल्या रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टरने नर्सला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.
एम ए अलीमूद्दीन असं या डॉक्टरचं नाव आहे. न्यायालयाने डॉक्टरची रवानगी कोठडीत केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अलीमूद्दीन याच्या रुग्णालयात पिडीत ३० वर्षीय डॉक्टर नर्सचे काम करत होती. त्याचे रुग्णालय चंद्रयानगुत्ता या परिसरात आहे. तेथे त्यांची ओळख झाली. त्यावेळी त्यांचे संबंध तयार झाले. त्यावेळी डॉक्टरने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवले. मात्र काही दिवसांपासून तो तिच्याकडे दूर्लक्ष करत होता. त्यामुळे महिलेने पोलिसांकडे धाव घेत आपली व्यथा मांडली. त्यानंतर पोलिसांनी चंद्रयानगुत्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.