मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादीकडून कोण उप मुख्यमंत्री होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. जयंत पाटील यांचे नाव यासाठी वारंवार चर्चेत होते मात्र मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. असे झाल्यास आज उद्धव ठाकरेंसोबत अजित पवार देखील शपथ घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवारांनी भाजपशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र त्यांनी राजीनामा दिल्याने भाजप सरकार कोसळले होते त्यानंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी गोट्यात दाखल झाले होते. त्यावेळी त्याच्यावर आता पक्ष कसा विश्वास ठेवणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देऊन पक्षाने त्याच्यावर विश्वास असल्याचे सिद्ध केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. तसंच उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.
उद्धव ठाकरेंसोबत हे नेते घेणार मंत्री पदाची शपथ
एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, सुनील प्रभू, अनिल परब, दीपक केसरकर, गुलाबराव पाटिल, संजय राठोड, आशीष जायसवाल, गोपीकिशन बाजोरिया, तानाजी सावंत, उदय सामंत शिवसेनेचे हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटिल, छगन भुजबळ, दिलीप वलसे पाटिल, हसन मुश्रिफ़, राजेश टोपे, नवाब मलिक, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जितेंद्र अव्हाड मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, बालासाहेब थोरात, के सी पड़वी, सुनील केदार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, नाना पटोले, वर्षा गायकवाड़ ह्या मंत्र्यांची नाव चर्चेत आहेत.
Visit : bahujannama.com