नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदीच्या राजकुमारीच्या पॅरिसमधील घरात ही चोरी झाली आहे. फ्रान्सच्या राजधानीमधील पॉश एरियात असलेल्या जॉर्ज अव्हेन्यूमधील अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला होता. राजकुमारी घरात नसताना चोरांनी घरातील कोट्यवधींचे सामान चोरून नेले. तिच्या घरामध्ये लाखो रुपयांचे हार, घड्याळे, दागिने आदी होते. या साऱ्या मौल्यवान वस्तूंची किंमत €600,000 युरो होती. ऑगस्टपासून सौदीची 47 वर्षीय राजकुमारी घराकडे आली ही नव्हती .
राजकुमारीला जेव्हा चोरी झाल्याचे समजले तेव्हा तिने घरत जाऊन मौल्यवान वस्तूंची पाहणी केली. त्या वस्तू चोरीला गेल्याचे लक्षत आले. याचा राजकुमारीला मोठा धक्का बसला. त्यामुळे सध्या हॉस्पिटलमध्ये ती उपचार घेत आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे जबाब नोंदविलेला नाही. या प्रकरणी बटाक्लानच्या बँक्सी आर्टवर्क येथून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
राजकुमारीच्या इमारतीमध्ये ऑगस्टपासून एक व्यक्ती राहण्यास आला होता. त्यानेच ही चोरी केल्याचे ली पॅरिसिअन वृत्तपत्राने म्हटले आहे. तर राजकुमारीच्या घराच्या स्पेअर किल्ल्यादेखील हरवल्या आहेत. सौदीच्या राजकुमारीकडे दोन हर्मीस बॅग होत्या. या बॅगची किंमत 10000 ते 30000 युरो होती. याव्यतिरिक्त मौल्यवान घड्याळे आणि दागदागिने होते.