मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या वापसीची चाहते आतुरतेनं वाट पहात आहेत. अशी चर्चा आहे की, शाहरुख खान आगामी सिद्धार्थ आनंद डायरेक्टेड (Siddharth Anand) पठाण (Pathan) या सिनमात काम करताना दिसणार आहे. हा अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. यात अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि दीपिका पादुकोणही (Deepika Padukone) दिसणार आहे. या सिनेमात जॉन निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. जॉन आणि दीपिका यांनी सिनेमासाठी तगडं मानधन घेणार आहेत असं समजत आहे.
अशी माहिती आहे की, जॉन अब्राहम यानं या सिनेमासाठी 20 कोटी एवढं मानधन घेईल. एका रिपोर्टनुसार दीपिका यासाठी जवळपास 15 कोटी मानधन घेईल. सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, दीपिका आणि आलिया यावेळी सर्वात महाग अभिनेत्री आहेत. यशराज फिल्म्स (Yash Raj Films Pvt. Ltd.) आणि शाहरुख खानची इच्छा आहे की, दीपिकानं या सिनेमात फीमेल लिडचा रोल साकारावा. पुढील वर्षी दीपिका या सिनेमाचं शुटींग सुरू करेल.
असंही बोललं जात आहे की, जर शाहरुख खानचं मानधन बाजूला केलं तर पठाण सिनेमाचं बजेट जवळपास 200 कोटी आहे. 2021 च्या दिवाळीत सिनेमा रिलीज केला जाऊ शकतो. परंतु कोरोनामुळं सिनेमाबद्दल निश्चत असं काही सांगितलं गेलं नाही.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.