बहुजननामा ऑनलाईन टीम : केळीचा वापर आपण खाण्यासाठी करतो, परंतु एखादी व्यक्ती सूड घेण्यासाठी या केळ्याचा वापर शस्त्र म्हणून उपयोग करते, याची कल्पना तरी केली आहे का ? परंतु हे हास्यास्पद वाटत असले तरी हे सत्य आहे. हि घटना नेब्रास्कामधील ओमाहा शहरातील आहे. एका स्त्रीने झालेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी म्हणून चक्क केळ्याचा वापर केला. या प्रकरणाची ओमाहा पोलीस सध्या या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.
ओमाहा शहरात बेन्सन टॉवरमध्ये राहणाऱ्या एका ५३ वर्षीय व्यक्तिचे एका २३ वर्षीय स्त्रीशी गाडी पार्किंगच्या जागेवरुन जोरदार भांडण झाले होते. हे भांडण इतके वाढले होते कि हे भांडण अखेर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांनी दोघांच्या या मतभेदांवर तात्पुरता तोडगा काढला.
परंतु हे प्रकरण इथेच थांबले नाही तर, त्या स्त्रीने भांडणाचा सूड म्हणून दररोज त्या व्यक्तिला केळे मारण्यास सुरुवात केले. तो व्यक्ती ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला , कि त्यावेळी ही स्त्री घराच्या बाल्कनीतून त्याच्यावर केळे फेकून मारत असे. हा प्रकार गेले आठवडाभर सुरु होता. अखेर रोजच्या या त्रासाला कंटाळून त्या व्यक्तीने अंगावर पडणाऱ्या केळ्यांची तक्रार त्याने पोलिसात केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या स्त्रीने केवळ एकदाच केळे फेकून मारल्याचे मान्य केले आणि “त्याने माझ्या मुलीला कुरुप म्हटले होते, त्यामुळे मी त्याला केळे फेकून मारले.” असे त्या महिलेने सांगितले. दरम्यान एखाद्याला केळे फेकून मारणे हा गुन्हा नाही म्हणून तिला पोलिसांनी सोडून दिले. परंतु या प्रकरणाची चौकशी संपलेली नाही.
Visit : bahujannama.com