मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे शरद पवार हे चांगलेच आक्रमक झाले असून ईडीच्या चुकीच्या कारवाईचा पूर्णपणे राजकीय लाभ उठवण्याचा त्यांनी प्रयन्त सुरु केला आहे.
आज ते स्वतः च ईडीच्या कार्यालयात जाऊन आपली चौकशी करा अशी मागणी करणार आहेत. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, शरद पवारांना ईडीच्या कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. यावेळी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस निदर्शने करणार आहेत. शरद पवारांच्या ईडी ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
पवारांच्या ईडी कार्यालय भेटीकडे गृह मंत्रालयाची नजर आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी आपण ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारणार आहे, असं सांगितलं होतं. परिस्थिती चिघळली तर सीआरपीएफ जवानांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना आत येऊ नये, असे आवाहन केले आहे.
Visit : bahujannama.com