अहमदाबाद : वृत्तसंस्था – स्वयंभू बाबा स्वामी नित्यानंद यांच्याविरुद्ध अपहरण प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान नित्यानंदच्या आश्रमातील मुलांना अश्लील साहित्य दाखवल्याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सोमवारी एका अधिकाऱ्याने दिली.
ज्या १४ व्यक्तींच्या विरोधात विशेष कोर्टाच्या आदेशानुसार ६ मार्चला एक एफआयआर नोंदवली गेली असून त्यात बाल कल्याण कमिटीचे सदस्यही सहभागी होते. नित्यानंदचे अनुयायी गिरीश तुरलापती यांच्या वतीने दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना कोर्टाने हे प्रकरण नोंदविण्याचे आदेश दिले असून तुरलापती अहमदाबादच्या बाहेरील हिरापूर गावात आश्रमसह गुरुकुलमध्ये राहतात.
ज्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वादग्रस्त स्वयंभू बाबा नित्यानंद यांच्या विरोधात तीन मुलांच्या अपहरण आणि चुकीच्या पद्धतीने कैद करून ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अहमदाबाद जिल्ह्यातील विवेकानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
तुरलापतीने आपल्या मर्जीने आरोप लावला होता की विवेकानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर.बी. राणा यांच्यासह पोलीस अधिकारी आणि सीडब्लूसीच्या सदस्यांनी आश्रमच्या नाबालिकांना आपत्तीजनक प्रश्न केले. तक्रारदाराने आरोप केला की, तपासकर्त्यांनी मुलांना मानसिक अत्याचार केला आहे. तसेच तपासकर्त्यांनी मुलींसह मुलांनाही छेडछाडीचे अश्लील व्हिडिओ आणि चित्रे दाखवली आहेत, असाही आरोप केला आहे. तसेच त्यांनी दावा केला आहे की, संबंधित पोलीस अधिकारी आणि सीडब्लूसीचे सदस्यांनी मुलांना अनुकूल विधान काढण्यासाठी भावनात्मक रूपाने ब्लॅकमेलही करण्याचा प्रयत्न केला.
विशेष पोक्सो लॉ कोर्टाने आपल्या आदेशानुसार पोक्सो कायदा, भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक राणा, उपअधीक्षक के.टी. कामरिया, उपअधीक्षक रियाझ सरवैया, उपअधीक्षक एस.एच. शारदा, जिल्हा बाल सुरक्षा अधिकारी दिलीप मेर आणि सीडब्ल्यूसी अध्यक्ष भावेश पटेलसह सीडब्ल्यूसीचे सदस्य अशी आरोपींची ओळख केली गेली आहे.
अहमदाबाद रूरल एससी/एसटी सेलचे पोलिस उपाधीक्षक पीडी मनवर म्हणाले, ‘आम्ही पोक्सो कोर्टाच्या आदेशानंतर पोलिस अधिकाऱ्यांसह १४ जणांविरूद्ध ६ मार्च रोजी एफआयआर नोंदवली. आतापर्यंत आम्ही फिर्यादीचे निवेदन नोंदविले असून पुढील तपास सुरू आहे.’