नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मंगळवारी कोरोना व्हायरसची १० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. केरळने सहा नवीन प्रकरणांची माहिती दिली असून राज्यात रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे. तर कर्नाटकमध्ये चार प्रकरणे समोर आली असून यासह भारतात रुग्णांची संख्या आता ५४ झाली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे म्हणाले की, सातवी पर्यंतचे वर्ग आणि परीक्षा ३१ मार्च पर्यंत स्थगित राहणार आहेत. आठवी, नववी आणि दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. ३१ मार्चपर्यंत सगळ्या शिकवणी, अंगणवाडी, मदरसे बंद राहतील.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु हे म्हणाले की, कर्नाटकमध्ये कोरोनाच्या ४ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आयजोलेशनमध्ये ठेवले आहे आणि आम्ही त्यांचे परीक्षण करत आहोत. मी लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोरोना व्हायरसपासून संक्रमणाला थांबवण्यासाठी सहयोग करण्याचा आग्रह करतो.
Karnataka Health Minister B Sriramulu: In Karnataka 4 positive cases have been confirmed.Their family members have been isolated separately and we are monitoring them. I urge citizens to take precautionary measures and cooperate in preventing the spread of infection #coronavirus pic.twitter.com/ZMK88KCLJk
— ANI (@ANI) March 10, 2020
चीनच्या वुहानमधून बाहेर पडलेला कोरोना विषाणू जगात वेगाने पसरला आहे. जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या १ लाख १३ हजारवर गेली असून चार हजारहून अधिक लोक मरण पावले आहेत. केरळमध्ये कोरोनाच्या ६ प्रकरणांची पुष्टी झाल्यावर राज्याचे पोलीस महासंचालक ऋषि राज सिंह यांनी राज्यभरात तुरुंगात आयजोलेशन वॉर्ड स्थापित करण्याचा आदेश दिला आहे. महासंचालकांच्या आदेशानुसार ताप आणि सर्दी सारख्या लक्षण असलेल्या कैद्यांना वेगळ्या रूममध्ये ठेवले जाणार आहे.
भारतीयांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्री एअर फोर्स सी- १७ ग्लोबमास्टर ५८ लोकांच्या पहिल्या तुकडीसह भारतात पोहोचले आहे. हे विमान इराणच्या तेहरानहून गाझियाबादमधील हिंडन एअरफोर्स स्टेशनवर उतरले.
#WATCH IAF C-17 Globemaster carrying the first batch of 58 Indian pilgrims, lands at Hindon air force station in Ghaziabad from Tehran, Iran. #CoronaVirus https://t.co/soTRjNkYl9 pic.twitter.com/kXvDMzcAtY
— ANI (@ANI) March 10, 2020
चिनी माध्यमांच्या म्हणण्यानुसार चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग कोरोनो विषाणूच्या साथीनंतर प्रथमच वुहानमध्ये दाखल झाले. गेल्या तीन महिन्यांपासून भयानक कोरोना विषाणूशी झुंज देत असलेल्या चीनने नवीन प्रकरणांमध्ये घट झाल्याचा दावा केला असून रुग्णांच्या उपचारासाठी तात्पुरती ११ रुग्णालयेही बंद करण्यात आली आहेत.