नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिन्याभरातच भारतीय स्टेट बँकेने फिक्स्ड डिपॉजिटवर व्याजदर कमी केले असून १० मार्चपासून लागू होणार्या ४५ दिवसांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या एफडीवर बँकेने ०.५० टक्के व्याज कपात केली आहे. नव्या दरानुसार ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर ४ टक्के व्याज मिळेल, जे पहिले ४.५० टक्के होता. याशिवाय एक वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधी असलेल्या एफडीवरील व्याजदरात ०.१० टक्के कपात केली आहे. यावर पहिले ६ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत होते.
फेब्रुवारीमध्ये बँकेने एफडीच्या दरात १० ते ५० बीपीएसची कपात केली होती. बँकेने ४६ ते १७९ दिवस, १८० ते २१० दिवस आणि २११ दिवसांपर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी एफडीच्या व्याजात कोणताही बदल केला गेला नाही. बँकेने MCLR मध्येही १५ बीपीएसची कपात केली आहे.
एसबीआय पेन्शनर्स आणि स्टाफला मिळणार हे फायदे
जर तुम्ही एसबीआयचे स्टाफ सदस्य असाल किंवा पेन्शनर असाल तर तुम्हाला फिक्स्ड डिपॉजिट अकाउंटमध्ये जमा रकमेवर सांगितल्या गेलेल्या इंटरेस्ट रेटपासून १ टक्का जास्त इंटरेस्ट मिळेल. तर दुसरीकडे तुम्ही एसबीआय स्टाफसह ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला १ टक्के इंटरेस्टसह ०.५० टक्के इंटरेस्ट असा दोन्हींचा फायदा मिळेल.