बहुजननामा ऑनलाईन – अनेकदा तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असताना तुमच्याकडून रेल्वेचे तिकीट हरवले असेल. यावेळी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता रेल्वे तिकीट हरवल्यास घाबरून जायची काहीही गरज नाही. कारण रेल्वेच्या काही नियमानुसार तुम्ही तुम्हचे हरवलेले तिकीट परत मिळवू शकता. फक्त यासाठी तुम्हच्याकडून काही शुल्क आकारले जातील.
तिकीट पुन्हा मिळवण्यासाठी करा हे काम
जर तुमचे रेल्वेचे रिजर्व तिकिट हरवले असेल तर सर्वात आधी तुम्हाला रेल्वेच्या कोणत्याही आरक्षण काउंटरवर जावे लागेल. आणि जाऊन तुम्हाला तुम्हचे ओळखपत्र द्यावे लागेल. त्याचबरोबर तिकिटाविषयी काही माहितीही द्यावी लागेल जसे की तुमचे तिकीट कधी काढले, कोठून प्रावास करायचे. जर तुम्हच्याकडे तिकिटावरील पीएनआर पत्ता असेल तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट सहज मिळवता येते. जर तुम्हचे रिझर्व आणि आरएसी तिकीट फाटलेले असेल किंवा ओले असेल तर डुप्लिकेट तिकीट काढले जाऊ शकते. जर तेच तुम्हचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट दिले जाऊ शकत नाही.
चार्ट बनण्याआधी इतके शुल्क भरावे लागेल
चार्ट तयार करण्यापूर्वी जर आपण स्लीपर क्लास कन्फर्मेशन तिकीट किंवा आरएसी तिकिटांची डुप्लिकेट तिकिटे काढली तर आपल्याला ५० रुपये शुल्क भरावे लागणार. स्लीपर व्यतिरिक्त इतर वर्गासाठी तुम्हाला १०० रुपये फी भरावे लागेल.
चार्ट बनल्यानंतर इतके शुल्क भरावे लागेल
चार्ट तयार झाल्यानंतर डुप्लिकेट तिकिटासाठी तुम्हाला तिकीट रक्कमेच्या ५० भाडे द्यावे लागणार. तर चार्ट्स बनवल्यानंतर आरएसी तिकीटाची डुप्लिकेट तिकीट बनविली जाऊ शकत नाही.