बहुजननामा ऑनलाइन – स्टायलिश आणि महागड्या वस्तूंची हौस प्रत्येकालाच असते, त्यात बॉलीवूड कलाकार ह्यांच्या हौसेला काही मोल नसते. त्यांच्यामध्ये मर्सडिज, ऑडीसारख्या महागड्या गाड्यांसाठी शर्यत लागलेली असते. परंतू बॉलीवूडचे असेही काही कलाकार आहेत जे महागड्या गाड्यांची हौस न बाळगता स्वस्त गाडयांना पसंती देतात.
जाणून घेऊया त्या ५ कलाकारांबद्दल :
१) नाना पाटेकर : नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील असे कलाकार आहेत, जे आपल्या कमाईतील जास्तीत – जास्त कमाई हि समाजसेवेसाठी वापरतात. करोडोंची कमाई करणाऱ्या ह्या अभिनेत्याची राहणी अत्यंत साधी आणि सरळ आहे. त्यांच्याजवळ महिंद्रा मेजर सारखी गाडी आहे , जिचे उत्पादन भारतात खूप वर्षांपासून बंद केले आहे.
२) अनिल कपूर : अनिल कपूर हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. अनिल कपूर यांच्याकडे मर्सडिज ए क्लास पासून ऑडी ए ८ तसेच लॅम्बोर्गिनी सारख्या गाड्या आहेत. परंतु ते नेहमी १२ लाख रुपयांच्या टाटा सफारीमध्येच फिरताना दिसतात.
३) जॅकी श्रॉफ : एका काळातील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांना देखील महागड्या गाड्यांची हौस नाही. त्याच्याकडे १० ते ११ लाखांची टोयोटा इनोव्हा आहे. जी एका कलाकाराच्या मानाने फारच स्वस्त आहे.
४) जॉन अब्राहम : जॉन अब्राहम याचे नाव प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत घेतले जाते. त्यांच्या पर्सनॅलिटी आणि बॉडी वर अनेक जण फिदा आहेत. जॉन यांच्याकडे महागड्या बाईक ची संख्या जास्त आहे. परंतु त्याला नेहमी मारुतीच्या मॉडिफाइड जिप्सी मध्ये फिरायला आवडते.
५) गुल पनाग : गुल पनाग हिने ‘डोर” आणि ‘जुर्मं’ सारख्या चित्रपटातून चाहत्यांवर आपली छाप पाडली. तिला महिंद्रा स्कॉर्पिओ सारख्या स्वस्त गाडीत फिरण्याची हौस आहे. तिने आपल्या गाडीचा लुक मॉडिफाइड केल्यामुळे हि गाडी जरा वेगळी आढळून येते.