पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शहर आणि जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून मुळसधार पाऊस सुरू आहे. सोमवारी आणि मंगळवारी जिल्हा प्रशासनाने शहर आणि जिल्हयातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली होती. जिल्हयातील काही तालुक्यातील आणि पुणे शहरातील पाऊस बर्यापैकी कमी झाला आहे पण मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यात अद्यापही अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हयातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या (दि. 7 ऑगस्ट) सुट्टी जाहिर केली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत आदेश काढले आहेत. हवामान विभागाने राज्यात बुधवारी देखील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुण्यातील 4 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी चालूच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मावळ, भोर, मुळशी आणि वेल्हयातील शाळा व महाविद्यालयांना बुधवारी सुट्टी जाहिर केली आहे. मात्र, जिल्हयातील इतर तालुक्यातील आणि पुणे शहरातील शाळा व महाविद्यालये उद्या चालू असणार आहेत.