बहुजननामा ऑनलाइन : भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी मोठी बातमी . भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे १००६६ पदांच्या नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. जीडीएस तसेच ग्रामीण पोस्ट सेवक पदाच्या रिक्त श्रेणीसाठी हि मेगा नोकर भरती चालू आहेत. आसाम, बिहार, गुजरात , कर्नाटक आणि पंजाब सारख्या राज्यांच्या पोस्ट सर्कल मध्ये या १०००० पेक्षा जास्त पदांच्या जागा रिक्त आहेत. इंडिया पोस्ट भरती २०१९ च्या नुसार या जीडीएस नोकऱ्या १० वी पास असणाऱ्यांसाठी आहेत. जीडीएस पदाच्या नोकरीसाठी अर्जदारास १० उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
जीडीएस नोकरीची हि अर्ज प्रक्रिया ५ ऑगस्ट २०१९ ते ४ सप्टेंबर २०१९ पर्यंत आहे. पोस्ट ऑफिसच्या जीडीएस पदाच्या ५ राज्यांमधील या भरतीची अधिकृत सूचना वेबसाईट वर देण्यात आली आहे.
अधिक माहिती जाणून घ्या :
* पाच राज्यांतील या पोस्ट सर्कल मध्ये १००६६ नोकर भरती सुरु आहे. आसाम ९१९ जीडीएस जागा, बिहार – १०६३ जीडीएस ओपनिंग , गुजरात – २५१० रिक्त जीडीएस पदे , कर्नाटक – २६३७ जीडीएस ओपनिंग, केरळ २०८६ जीडीएस आणि पंजाब – ८५१ अश्या प्रकारे जागा रिक्त आहेत.
* आपल्या गुणवत्ता श्रेणीच्या आधारे वेतन दिले जाणार आहे. हे वेतन रुपये १०, ००० आणि रुपये १,५००० च्या सीमा मर्यादेत असणार आहे.
* या १००६६ इंडिया पोस्ट जीडीएस नोकरीच्या अर्ज प्रवेशासाठी http://appost.in/gdsonline/ या संकेतस्थळावर भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.