मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर ठाकरे सरकारचे खातेवाटप नेमके कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी शपत घेताना ज्या ज्या नेत्यांना शपत दिल्या अशा नेत्यांकडे मंत्री पदाचा पदभार देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे कोणत्याही खात्याचा पदभार घेतलेला नाही. सर्वात महत्वाचे समजले जाणारे गृह खाते शिवसेनेने स्वतः कडे घेत एकनाथ शिंदे यांना राज्याचे गृहमंत्री बनवले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे #खातेवाटप जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली मान्यता. pic.twitter.com/rypCNbwGkc— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 12, 2019
जाणून घेऊयात नेमके कोणत्या नेत्याला कोणते मंत्रिपद मिळाले
1. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे – कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.
2. एकनाथ संभाजी शिंदे – गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.
3. छगन चंद्रकांत भुजबळ – ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन
4. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात – महसूल, उर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
5. सुभाष राजाराम देसाई – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रिशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खार भूमी विकास
6. जयंत राजाराम पाटील – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास
7. डॉ. नितीन काशिनाथ राऊत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्याग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण
तर उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली तसेच उपमुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स देखील अद्याप कायम आहे.