बहुजननामा ऑनलाइन – अनेक लोक नोकरी असल्यामुळे त्यांच्या सेवानिवृतीच्या फंडाची चिंता करत नाही. विशेषतः अशा वेळी जेव्हा लोकांची नवीनच नोकरी असते. लोक असा विचार करतात की सेवानिवृती होईपर्यंत आपल्याला बराच वेळ आहे. नोकरीतुन निवृत्त झाल्यानंतर एक आरामदायक जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने बचत करणे गरजेचे आहे. काही लोक बचत देखील सुरु करतात परंतु अनेकांकडून यामध्ये मोठ्या चुका होतात. म्हणून जर निवृत्तीसाठी बचत करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
निवृत्तीसाठी बचत सुरु करताना पुढील गोष्टींची काळजी नक्की घ्या
1. निवृत्तीची योजना वेळेवर सुरु झाली पाहिजे जे लोक यासाठी उशीर करतात त्यांची मोठी चूक होते जेव्हा तुम्ही याबाबतची बचत सुरु कराल त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर तुम्हाला या बचतीचा योग्य फायदा मिळेल.
2. व्यक्तीला जोखम उचलण्यासाठी स्वतः तयार असणे गरजेचे आहे आणि त्यानुसार गुंतवणूकीचा पर्याय निवडणे देखील गरजेचे आहे. लोक बर्याचदा अधिक नफ्यामुळे मोहात पडतात आणि धोकादायक गुंतवणूकीचा पर्याय निवडीकडे वळतात मात्र असे प्रकार टाळावेत. एखाद्या व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता वय, जबाबदाऱ्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार बदलते. उदाहरणार्थ, अविवाहित व्यक्ती विवाहित व्यक्तीपेक्षा जास्त जोखीम घेऊ शकते.
3. जर तुमच्यकडे मर्यादित आर्थिक पाठबळ असेल तर तुम्ही याबाबतच्या सुरक्षेबाबत देखील लक्ष दिले पाहिजेएका आपत्कालीन फंडाचे निर्माण करा ज्यामध्ये नऊ महिने ते एका वर्षापर्यंतचे पैसे असतील. उदाहरणार्थ जर तुम्हाला अचानक एखाद्या आपत्कालीन गोष्टीला सामोरे जावे लागले किंवा नोकरी गमवावी लागली तर जमा केलेल्या फंडामधून तुम्हाला फंड निर्मिती करता येईल.