बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरस संकटात सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीन सतत सैन्याची हालचाल सुरू आहे़. नुकत्याच समोर आलेल्या सॅटेलाइट(New satellite photos) इमेजवरून दिसून आले आहे, की चीनने डोकलाम पठारात रस्ते निर्मिती सुरू केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनने या क्षेत्रात एका टनलचे बांधकाम केले आहे, जेथे भारत आणि चीन 2017 च्या स्टँड-ऑफमध्ये सहभागी होते.
एनडीटीव्ही रिपोर्टनुसार, ऑगस्ट 2019च्या छायाचित्रांमध्ये रस्ते मार्गावर जमिनीच्यावर बोगदा दिसून आला आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये समोर आलेल्या सॅटेलाइट इमेजमध्ये आढळले, की चीनने या बोगद्याची लांबी सुमारे 500 मीटरपर्यंत वाढवली आहे. लष्करी तज्ज्ञांनी एनडीटीव्हीला सांगताना संकेत दिले, की चीनचे लक्ष्य स्पष्ट आहे. डोकलाम पठारावर हिवाळ्याच्या महिन्यात रस्त्यांचा वापर अप्रतिबंधित राहावा, यासाठी चीनने बोगद्याची लांबी वाढवली आहे.
तज्ज्ञांनी सांगितले, की डोकलाम पठार पूर्णपणे हिवाळ्याच्या महिन्यांदरम्यान बर्फाने अच्छादलेला असतो, ज्यामुळे येथे गस्त घालणे आव्हान असते. वादग्रस्त क्षेत्रात हालचाली कायम राखण्यासाठी चीनने हे केले आहे. चीनची ही कुरापत अशावेळी समोर आली आहे जेव्हा भारत आणि चीनचमध्ये पूर्व लडाखमध्ये वाद जारी आहे. येथे दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे अनेक भागांत चीनच्या सैनिकांकडून घुसखोरीचे अनेक प्रकार घडल्याने तणाव आहे. 6 नोव्हेंबरला चुशुलमध्ये कोरो कमांडर लेव्हलची 8वी चर्चा झाली होती. ज्यामध्ये थोडी सहमती होताना दिसत आहे. मात्र, भारताला चीन चलाखी माहीत आहे, ज्यामुळे भारत विचारपूर्वक पाऊल पुढे टाकत आहे. या अगोदरसुद्धा चीनने चर्चांमध्ये गुंतवून भारताची फसवणूक केली आहे.