नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाचे चारही दोषी फाशीची तारीख जवळ येताच अस्वस्थ होत आहेत. फाशीपासून वाचायचा कोणता ना कोणता तरी पर्याय शोधत असतात. यावेळी आता या दोषींमधील पवनने पुन्हा एकदा कोर्टाकडे धाव घेत यावेळी पोलिसांवर गंभीर आरोप लावला आहे. त्याने पोलिसांवर आरोप लावत म्हटले आहे की, मला मारले असून त्यामुळे माझ्या डोक्यावर गंभीर जखम झाली. त्याने कोर्टाकडे दोषी असलेल्या पोलिसांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या दोन पोलीस मंडोली जेलमध्ये तैनात असून याचिकेवर कोर्टाने तुरुंग प्रशासनाला नोटीस जारी करत उत्तर मागितले आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी १२ मार्चला होणार आहे.
2012 Delhi gang rape case: One of the death row convicts,Pawan moves Delhi court seeking registration of FIR against 2 policemen of Mandoli jail,alleging that they thrashed him, causing severe head injury. Court issues notice to jail admn seeking reply. Matter listed for March 12
— ANI (@ANI) March 11, 2020
निर्भयाच्या चारही दोषींना ८ दिवसांनंतर फाशी होणार असून २० मार्चला सकाळी ५.३० वाजता फाशी देण्याचा आदेश कोर्टाने जारी केला आहे. या कारणामुळे फाशीची तारीख जवळ येताच दोषी त्यापासून बचाव करण्यासाठी रस्ता शोधत आहेत. यापूर्वी निर्भयाच्या दोषींपैकी विनय शर्माने दिल्लीचे उपराज्यपाल यांच्याकडे याचिका दाखल करत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
सर्व दोषींनी त्यांचे सर्व कायदेशीर पर्याय वापरले असून न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेपासून ते राष्ट्रपतींकडे केलेल्या दया याचिकेपर्यंत ते सगळे पर्याय वापरले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे कोणाताही पर्याय उरलेला नाही.